औरंगाबाद- दीपक
सावंत यांनी औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादचे नवे पालकमंत्री होणार
असल्याचे बोलले जात आहे. यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठांकडून शिफारस करण्यात आली असून
त्यासाठीच्या हालचाली अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे या निर्णयावर अद्याप उद्धव
ठाकरेंकडून शिक्कामोर्तब होणे बाकी आहे, अर्जुन खोतकर
यांची देखील पालकमंत्री पदासाठी चर्चा होती मात्र एकनाथ सावंत यांच्या बद्दल
स्वतः खासदार चंद्रकांत खैरे यांनी माहिती
दिली आहे.
दिपक
सावंत यांचा आरोग्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांनी स्विकारल्यानंतर त्यांचे
औरंगाबादचे पालकमंत्रीपद रिक्त झाले आहे. औरंगाबादला नवे पालकमंत्री म्हणून एकनाथ
शिंदेंना संधी मिळावी अशा हालचाली शिवसेनेच्या वरिष्ठ वर्तुळात सुरु आहेत. एकनाथ
शिंदेंना औरंगाबादचे पालकमंत्री केल्यावर शिवसेनेला त्याचा कसा फायदा होईल याविषयी
वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असल्याचे सुत्रांनी सांगितले. राज्यमंत्री अर्जुन
खोतकर यांच्या नावाची देखील औरंगाबादच्या पालकमंत्री पदासाठी चर्चा होती मात्र आता
या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
रामदास
कदम पालकमंत्री असतांना खासदार खैरे आणि कदम यांच्यात लहानसहान विषयावरुन प्रचंड
वादावादी होत होती. शहरातील शिवसैनिकांवरही या वादाचे गंभीर पडसाद उमटंत होते.
त्यानंतर उद्धव ठाकरेंना खैरेंनी विनंती केल्यानंतर औरंगाबादच्या
पालकमंत्रीपदासाठी दिपक सावंत यांचा नंबर लागला होता. पण त्यांना फार वेळ
औरंगाबादसाठी देता आला नाही.